दुर्मिळ नाणी सापडल्याने शेतकऱ्याला मिळणार सतरा कोटी


लंडन – एखाद्याचे नशीब उजळायला वेळ लागत नाही. अशीच एक घटना नुकतीच घडली. ब्रिटेन येथील एका शेतकऱ्यांच्या शेतात 17 कोटी रूपयांचे प्राचीन, दुर्मिळ चांदीची नाणी सापडली आहेत.

हैाशी इतिहाससंशोधन माइक स्मेल हे आपल्या मित्रासोबत संशोधन करीत होते. त्यांना ब्रिटपोर्ट येथे एंथनी बटलर यांच्या शेतात सहाशे दुर्मिळ नाणी सापडली. ही चांदीची नाणी रोम साम्राजातील असल्याचे सांगितले जाते. ही नाणी रोमन जनरल मार्क एंथनी यांच्या कार्यकाळात उपयोगात आणली गेली आहे, म्हणून याला ऐतिहासिक महत्व आहे.

माइक हे या परिसरात संशोधन करीत होते. अचानक त्यांच्या मेटल डिटेक्टरचा जोरात आवाज यायला लागला. त्यानंतर त्यांनी ती जमीन खोदली. त्यांना तिथं काही नाणी सापडली. माइक यांनी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना त्याची माहिती दिली. संबधित अधिकाऱ्यांनी हे शेत सील केले आहे.

या चांदीच्या नाण्यांना येथील प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यानंतर या नाण्यांना एका संग्राहलयात ठेवण्यात येणार आहे. नियमानुसार माइक यांना निम्यां नाण्यांची किमंत शेतकऱ्याला द्यावी लागणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला 17 कोटी रूपये मिळणार आहे. अचानक ही नाणी सापडल्याने एका रात्रीत या शेतकऱ्याचे भविष्य उजळलं आहे. म्हणतात ना, किस्मत जब मेहरबान होती है तो छप्पर फाड़ कर देती है….

Leave a Comment