व्हायरल; अन् नागरे-पाटलांनी ‘बाला’वर धरला ठेका


पुणे – सध्या सोशल मीडियावर कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे विश्वास नांगरे पाटील यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून विश्वास नांगरे पाटील या व्हिडीओत एकदम वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ एका खासगी कार्यक्रमातील असल्याचे दिसत आहे. तर अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल्ल ४’ चित्रपटातील ‘बाला’ गाण्यावर विश्वास नांगरे पाटील नाचत आहेत. नांगरे पाटलांचा हा वेगळा अंदाज पाहून नेटकरीही त्यांचे भरभरुन कौतूक करत आहेत.


गुरुवारी सोशल मीडियावर नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून विश्वास नांगरे पाटील यांची ओळख आहे. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणारे अनेक तरुण विश्वास नांगरे पाटील यांना आदर्श मानतात. त्यांची भाषणे सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. पण यावेळी त्यांचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यातील त्यांचा हा वेगळा अंदाज पाहून अनेकजण त्यांचे कौतूक करत आहेत.

Leave a Comment