भारतीय रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट

Image Credited – blog.socialcops

भारतीय रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका आर्थिक वर्षात रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाला प्राण गमवावे लागलेले नाहीत. सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय रेल्वेची ही मोठी कामगिरी आहे.

भारतीय रेल्वेच्या अहवालानुसार, मार्च 2019 पासून ते आतापर्यंत एकाही प्रवाशाचा रेल्वे अपघातात मृत्यू झालेला नाही. भारतीय रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटले की, रेल्वे आता प्रचार-प्रसाराचे सशक्त माध्यम बनत आहे. रेल्वे प्रभावी माध्यम म्हणून पुढे येत आहे.

भारतीय रेल्वेच्या अहवालानुसार, मागील 38 वर्षात रेल्वेंमध्ये धडक, आग लागणे, रेल्वे क्रॉसिंग सारख्या घटनेत जवळपास 95 टक्के कमी आली आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 73 रेल्वे दुर्घटना झाल्या तर 2018-19 मध्ये हा आकडा 59 होता.

केंद्र सरकार रेल्वेवर मोठे काम केले आहे. आधीच्या तुलनेत सेवा, वेळ अशा अनेक गोष्टीत रेल्वेत सुधारणा झाल्या आहेत.

Leave a Comment