या कलाकारने वृत्तपत्रापासून बनवली युद्धनौका सीरिज

Image Credited – Bhaskar

जापानी कलाकार अत्सुशी अडाचीने जुन्या वृत्तपत्रांपासून युद्धनौका सीरिज बनवली आहे. अडाचीने युद्धनौकांचे हे मॉडेल 3 ते 7 डिसेंबर रोजी न्युयॉर्कमध्ये पार पडलेल्या प्रदर्शनासाठी बनवले होते. या सीरिजमध्ये लहान जहाजेपासून ते विशाल युद्धनौकेचा समावेश आहे. अडाचीने याआधी कागदापासून मशीन, शस्त्रास्त्र सामग्री आणि स्पेस उपकरण बनवले आहे. त्यांच्याद्वारे तयार करण्यात आलेला अंतराळ यात्री नील आर्मस्ट्राँगचा स्पेस सूट देखील चर्चेचा विषय ठरला होता.

Image Credited – Bhaskar

अडाचीने सांगितले की, कोणतेही मॉडेल बनवण्यासाठी कार्डबोर्ड आणि मॅचस्टिकचा वापर केला जातो. मात्र या पेक्षा वृत्तपत्र चांगले माध्यम आहे. अडाची वृत्तपत्राला एक प्रकारची टाईममशीन मानतात. त्यामुळे ते मॉडेल बनवण्यासाठी वृत्तपत्राचा वापर करतात. त्यांच्या मॉडेलचे जगभरात प्रदर्शन भरवले जाते.

Image Credited – Bhaskar

अडाचीने सांगितले की, लहानपणींच्या आठवणीतून हे मॉडेल तयार करत आहे. लहानपणी सेल्फ डिफेन्स फोर्स आणि अमेरिकन आर्म्ड फोर्स बेसला भेट दिली होती. तेथे पाहिलेले युद्धनौका, लढाऊ विमानाचे 3डी मॉडेल बनवले आहेत. याद्वारेच माझ्या करिअरचा पाया रचला गेला.

Leave a Comment