पुणेरी ढोल ताशावर ‘जिंगल बेल’चा ताल, व्हिडीओ व्हायरल

Image Credited – Latestly

काल सर्वत्र ख्रिसमस सणानिमित्ताने आनंदाचे, रोषणाईचे वातावरण होते. नवीन वर्षापर्यंत हा उत्साह तसाच कायम असणार आहे. ख्रिसमसमध्ये जिंगल बेल हे गाणे सर्वत्र गायले जाते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारात हे गाणे गायले जाते. जिंगल बेलचे गुजराती, भोजपूरी आणि मराठी व्हर्जन देखील आले आहे. आता अशाच एका हटके जिंगल बेल गाण्याचे व्हर्जनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

महाराष्ट्रीयन पद्धतीने नऊवारी साडी घालून एक मुलगी सेक्सोफोन आणि पुणेरी ढोल ताशावर जिंगल बेल गाणे वाजवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ कधी व कुठला आहे, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र लोकांना या हटके स्टाईलमधील हे गाणे आवडत आहे.

Leave a Comment