मानवी अंगांबद्दल शिकवण्यासाठी या शिक्षिकेने वापरली भन्नाट कल्पना

Image Credited – NDTV

प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवत असतो. कोणी प्रेमाने तर कोणी ओरडून विद्यार्थ्यांना शिकवते. मात्र स्पेनमधील एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जे केले त्याने सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यांना मानवी शरीराच्या रचनेबद्दल सांगण्यासाठी थेट एंटोमी बॉडीसूट (शरीरातील अंतर्गत भागांचा बॉडीसूट) घातला.

या हटके स्टाईलमध्ये शिकवणाऱ्या शिक्षिकेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या शिक्षिकेचे नाव वेरोनिका ड्यूक असून, त्या स्पेनच्या वेडेडोलिड शाळेत जीवशास्त्राच्या शिक्षिका आहेत. मुलांना योग्य पद्धतीने मानवी अंगांबद्दल समजावे म्हणून त्यांनी ही पद्धत वापरली.

Image Credited – scoopwhoop

वेरोनिका या 15 वर्षांपासून विज्ञान, इंग्रजी, कला, इतिहास आणि स्पॅनिश हे विषय शिकवत आहेत. त्यांनी सांगितले की, मुलांना बोर्डवर आकृती तयार करून समजवणे अवघड जाते. काहींना समजते काहींना नाही. म्हणून मी हा पर्याय निवडला. मी मानवी शरीर रचना असणारा एक बॉडीसूट तयार केला. मला वाटते की, यापेक्षा मजेशीर आणि सोपी पद्धत असू शकत नाही.

वेरोनिका यांचे हे फोटो त्यांच्या पतीने सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो आता व्हायरल होत आहेत.

Leave a Comment