या तारखेला लाँच होऊ शकतो वनप्लसचा फोल्डेबल स्मार्टफोन

Image Credited – AajTak

स्मार्टफोन कंपनी वनप्लस7 जानेवारील कॉन्सेप्ट वन स्मार्टफोन लाँच करणार आहे. लॉस वेगस येथील सीईएस 2020 शो दरम्यान हा फोन सादर केला जाणार आहे. मात्र कंपनीने हा स्मार्टफोन कसा असेल, याविषयी अद्याप माहिती दिलेली नाही. हा कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे.

चीनी मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट वेईबोने वनप्लसचा एक टीझर व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये कॉन्सेप्ट वन हा फोल्डेबल फोन असल्याचे दिसत आहे.

रिपोर्टनुसार या फोनचे डिझाईन सॅमसंगच्या गॅलेक्सी फोल्डप्रमाणे असेल. म्हणजेच अनफोल्ड केल्यानंतर फोन टॅबलेटच्या आकाराच होईल.

या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये वनप्लस नवीन चार्जिंग टेक्नोलॉजी देखील देऊ शकते. याशिवाय 40 वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील मिळू शकते. तसेच 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळू शकतो.

कंपनीने आपल्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, कॉन्सेप्ट वन नावावरूनच स्पष्ट आहे की, हे डिव्हाईस या सीरिजमधील पहिले असेल व वनप्लसच्या इनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजीच्या कमिटमेंट दर्शवते.

वनप्लसने मागील 6 वर्षात एकूण 13 स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. कंपनी पुढीलवर्षी 3 नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते.

Leave a Comment