बहुप्रतीक्षित ‘स्ट्रीट डान्सर’चा ट्रेलर अखेर रिलीज


सरस डान्स स्टंट्स, ताल धरायला लावणारे संगीत आणि वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभू देवा आणि नोरा फतेही यांचा जबरदस्त परफॉर्मन्स असलेल्या ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर आज अखेर रिलीज करण्यात आला. ‘एबीसीडी’ सिरीजचा हा तिसरा भाग असून या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसुजा याने केले आहे.

हा चित्रपट हिंदीसह तेलुगू आणि तमिळ भाषेतही रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, क्रिश्नन कुमार आणि लिझेले डिसूजा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी हा ट्रेलर शेअर केला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ ट्रेडिंगमध्ये आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होत आहे. 24 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Leave a Comment