प्लास्टिक कचरा द्या आणि जेवण मोफत मिळवा

(Source)

प्लास्टिकच्या कचऱ्याचे योग्यरित्या व्यवस्थापन करण्यासाठी आणि प्लास्टिक प्रदुषणाविषयी लोकांमध्ये जागृकता पसरवण्यासाठी ओडिसामधील भुवनेश्वर महानगरपालिकेने एक खास अभियान सुरू केले आहे. महानगरपालिकेतर्फे अर्धा किलो प्लास्टिक कचरा देणाऱ्याला मोफत जेवण देण्यात येत आहे.

राज्य सरकारच्या आहार योजनेंतर्गत महानगरपालिकेने युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामसोबत मिळून मिल फॉर प्लास्टिक मोहिम सुरू केली आहे. भुवनेश्वरमध्ये सरकारच्या आहार सेंटरवर ही मोहिम राबवली जाते.

या मोहिमेविषयी महानगरपालिकेचे आयुक्त प्रेम चंद्रा चौधरी म्हणाले की, ही एकप्रकारे प्लास्टिक जमा करणे आणि लोकांना जेवण उपलब्ध करून देण्याची मोहिम आहे. असे अनेक लोक आहेत जे प्लास्टिक जमा करतात तर अनेक लोक प्लास्टिक फेकून देतात. त्यामुळे हे प्लास्टिक जमा करण्यासाठी काय करता येईल, या विचारातून ही मोहिम सुरू केली.

त्यांनी सांगितले की, भुवनेश्वरच्या 11 आहार सेंटरवर कोणीही येऊन अर्धा किलो प्लास्टिकच्या बदल्यात जेवण घेऊ शकते.

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामचे प्लास्टिक व्यवस्थापन प्रोजेक्टचे प्रमुख तराणा शायद म्हणाले की, या मोहिमेद्वारे लोकांना पर्यावरणाविषयी जागृक करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. लोकांनी रस्त्यावर प्लास्टिक न फेकता ते जमा करून जेवण घ्यावे.

Leave a Comment