रजनीकांत यांच्या आगामी ‘दरबार’चा ट्रेलर रिलीज


आगामी ‘दरबार’ या चित्रपटाच्या माध्यमातून दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. रजनीकांत यांचा खास अंदाज या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. या चित्रपटामध्ये बॉलीवूडचा अण्णा अर्थात अभिनेता सुनील शेट्टी देखील भूमिका साकारत आहे. ट्रेलरमधील रजनीकांत यांच्या तोंडी असलेले डायलॉगदेखील प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी पुरेसे आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगादोस केले असून हा चित्रपट ९ जानेवारीला पोंगलच्या पार्श्वभूमीवर रिलीज होणार आहे. यामध्ये अभिनेत्री नयनाताराचीही मुख्य भूमिका आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेतही हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. रजनीकांत या चित्रपटात २५ वर्षानंतर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांनी १९९२ मध्ये ‘पांडियन’ या तामिळ चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर अनेक भूमिका केल्यानंतर तब्बल २५ वर्षांनी पुन्हा एकदा पोलिसांच्या वर्दीत रजनीकांत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Leave a Comment