‘तान्हाजी’चा दुसरा ट्रेलर रिलीज


बॉलीवूडचा सिंघम अर्थात अजय देवगणच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. तान्हाजींच्या शौर्यगाथेची झलक या ट्रेलरमध्येही पाहायला मिळते. वीर मावळ्यांनी महाराजांच्या स्वराज्यावर शत्रूंचा डोळा असतानाही कशा प्रकारे मोठ्या धीराने आणि साहसाने आपल्या जीवाची बाजी लावली, याची साहसकथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

कोंढाणा किल्ल्यासाठी तान्हाजी मालुसरे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लढाई केली होती. आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी घरात सुरू असताना ते कोंढाणा राखण्यासाठी सज्ज झाले होते. त्यांनी आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे, असे म्हणत या लढाईसाठी आपल्या प्राणाजी बाजी लावली.

ट्रेलरमध्ये सुभेदार तान्हाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचीही झलक पाहायला मिळते. अजय देवगनसोबतच या चित्रपटात काजोल, शरद केळकर, सैफ अली खान, देवदत्त नागे आणि इतरही अनेक कलाकार झळकणार आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले असून हा चित्रपट महाराष्ट्रात मराठी भाषेतही रिलीज होणार आहे. हा चित्रपट १० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, हे आगामी काळच सांगेल.

Leave a Comment