‘मर्दानी २’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी वाटचाल


मागील आठवड्याच्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर स्त्रियांवरील अत्याचारावर आधारित अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मर्दानी २’ हा चित्रपट रिलीज झाला. प्रेक्षकांचा राणी मुखर्जीच्या याआधी रिलीज झालेल्या ‘मर्दानी’ला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे प्रेक्षकांचे ‘मर्दानी २’कडे लक्ष होते. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाची यशस्वी वाटचाल पाहायला मिळाली.


‘मर्दानी २’ने शुक्रवारी ३.८० कोटीची दमदार ओपनिंग केल्यानंतर शनिवारी ६.५५ कोटी आणि रविवारी ७.०८ कोटीचा कमाई केली. तीनच दिवसात या चित्रपटाने १८.१५ कोटीचा व्यवसाय केला आहे. ‘मर्दानी २’ ने पहिल्या आठवड्याच्या कमाईत तिच्या ‘हिचकी’, आणि ‘मर्दानी’ या चित्रपटांना मागे टाकले आहे. हा चित्रपट विदेशातही चांगला व्यवसाय करत आहे. प्रेक्षकांसह चित्रपट समीक्षाकारांनीही या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. राणी मुखर्जीने या चित्रपटात पोलीस अधिकारी ‘शिवानी रॉय’ची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गोपी पुथरन यांनी केले आहे.

Leave a Comment