‘रागिनी एमएमएस रिटर्न्स-२’ चा बोल्ड ट्रेलर रिलीज


एकता कपूरच्या बालाजी अल्टने रागिनी एमएमएसच्या यशानंतर ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’या वेबसीरीजची निर्मिती केली. प्रेक्षकांचा या वेबसिरीजला देखील प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स-२’ येत आहे. या सीरीजचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. यात अॅक्शन, स्पस्पेन्ससोबत बोल्डनेसचा तडका दिसून येत आहे.

रागिनी श्रॉफ या मुलीची कथा १.५५ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री दिव्या अग्रवाल रागिनीची भूमिका साकारत असून ती अतिशय बोल्ड रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रागिनी तिच्या मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टीसाठी एका ठिकाणी ट्रीपसाठी जाते. एक मुलांचा ग्रुपदेखील त्याच ठिकणी पार्टी करण्यासाठी आलेला असतो. हे सर्व एका हॉटेलमध्ये थांबतात. या कथेला तिथून सुरुवात होते. यानंतर अनेक रंजक असे ट्विस्ट पाहायला मिळतात. हॉटेल मालकाच्या भूमिकेत वरुण सूद दिसणार आहे.

ही वेबसिरीज येत्या १८ डिसेंबरला पाहता येणार होणार असून यात सनी लिओन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिरीजमध्ये ‘हॅलो जी’ हे गाणे असून या गाण्याच्या व्हिडिओला आतापर्यंत युट्यूबवर १ करोड पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गायिका कनिका कपूरने हे गाणे गायले असून सनीचा या गाण्यातील डान्स चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.

Leave a Comment