WWE ची टिकटॉकवर एंट्री

(Source)

जगभरात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच टिकटॉकचे वेड आहे. आता याच टिकटॉकने जगातील सगळ्यात मोठी रेसलिंग कंपनी वर्ल्ड रेस्टलिंग एन्टरटेन्मेंट अर्थात डब्ल्यूडब्ल्यूईला देखील भूरळ घातली आहे. युट्यूबवरील सर्वाधिक स्बस्क्राईबर्स असणाऱ्या चॅनेल पैकी  डब्ल्यूडब्ल्यूई एक आहे. याशिवाय इतर मीडिया प्लॅटफॉर्मवर डब्ल्यूडब्ल्यूईचे कोट्यावधी फॉलोवर्स आहेत. आता डब्ल्यूडब्ल्यूईने अधिकृतरित्या टिकटॉक जॉईन केले आहे.

आता टिकटॉकवर डब्ल्यूडब्ल्यूईचे स्वतःचे चॅनेल असणार आहे. मात्र विशेष गोष्ट अशी की, रेसलिंगचे चाहते आणि क्रिएटर्सला डब्ल्यूडब्ल्यूईचे प्रसिद्ध एंट्रांस (आगमन) म्यूझिक देखील वापरता येणार आहे.

आता तुम्ही तुमच्या टिकटॉक व्हिडीओमध्ये डब्ल्यूडब्ल्यूई स्टार स्टोन गोल्ड, द अंडरटेकर, जॉन सिन्हा, बिकी लिंच आणि द रॉकचे खास गाणे वापरू शकणार आहात. 30 सुपरस्टार्सचे म्यूझिक टिकटॉकमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ही गाणी इंस्टाग्राम युजर्ससाठी अद्याप उपलब्ध नाहीत, मात्र आता टिकटॉक युजर्स याचा आनंद घेऊ शकणार आहेत.

डब्ल्यूडब्ल्यूईने याविषयी म्हटले आहे की, आता टिकटॉक युजर्स डब्ल्यूडब्ल्यूईचे प्रसिद्ध इंट्रांस म्यूझिम वापरून स्वतःचे व्हिडीओ बनवू शकतात. यामुळे चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सुपरस्टारशी कनेक्ट होता येईल.

याशिवाय डब्ल्यूडब्ल्यूई देखील टिकटॉवर दररोज नवनवीन कंटेट टाकणार आहे. कंपनीने काही दिवसांपुर्वीच द बम्प नावाची लाईव्ह सीरिज सुरू केली आहे. जी फेसबुक, ट्विटर, युट्यूब आणि डब्ल्यूडब्ल्यूई नेटवर्क स्बस्क्रिप्शन सर्व्हिसवर पाहता येते.

 

Leave a Comment