अंगावर काटा आणणारा दीपिकाच्या ‘छपाक’चा ट्रेलर रिलीज


नुकताच अभिनेत्री दीपिका पादुकोणची मुख्य भूमिका असलेला ‘छपाक’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरची दीपिकाचा परिपक्व अभिनय, अंगावर काटा आणणारे संवाद आणि मेघना गुलजार यांचे वास्तववादी दिग्दर्शन ही जमेची बाजू आहे.

हा चित्रपट अॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित असला, तरी चित्रपटात दीपिका साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचे नाव ‘मालती’ ठेवण्यात आली आहे. दीपिकाचा फर्स्ट लूक मार्च महिन्यात रिलीज करण्यात आला होता, तेव्हाच प्रेक्षकही अवाक झाले होते. दीपिकासोबत या चित्रपटात अभिनेता विक्रांत मस्सी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

आपल्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक भूमिका साकारत असल्याचे दीपिकाने म्हटले आहे. दीपिकाचा लग्नानंतर प्रदर्शित होणाराहा पहिलाच चित्रपट आहे. याआधी जानेवारी 2018 मध्ये दीपिकाने ‘पद्मावत’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये ती अभिनेता रणवीर सिंहसोबत विवाहबंधनात अडकली. दरम्यानच्या काळात ‘झिरो’ चित्रपटातील पाहुण्या कलाकाराची व्यक्तिेरखा वगळता ती मोठ्या पडद्यावर दिसली नाही. ‘छपाक’ हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच अजय देवगन-काजोल यांच्या ‘तान्हाजी’ चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर छपाकची टक्कर होईल.

Leave a Comment