बीबीसी प्रेझेंटरच्या कार्यक्रमादरम्यान कुत्र्याने केली विचित्र करामत, व्हिडीओ व्हायरल

(Source)

भारतात अशा अनेक विचित्र घटना घडतात की, पाहणारे विचारच करत राहतात. अशाच एक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बीबीसी चॅनेलचे प्रेझेंटर टॉम ब्रुक सध्या त्यांचा स्पेशल एपिसोड टॉकिंग मूव्हीसच्या चित्रकरणासाठी भारतात आहे. मात्र टॉम ब्रुक यांची प्रसिद्धी एका कुत्र्यामुळे कमी झाली असे म्हणावे लागेल. कारण व्हिडीओ पाहताना प्रेंझेंटरच्या जागी मागील कुत्र्याकडेच लक्ष जात आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ब्रुक हे रिक्षामध्ये बसून मुंबईच्या रस्त्यावरून प्रवास करत आहेत. ब्रुक हे स्वतःचे ओळख करून देतात. तेवढ्यात पाठीमागून एक पांढऱ्या रंगाचे कुत्रे स्कूटरवर बसून निघून जाते. हे कुत्रे आरामशीररित्या स्कूटरवर मागच्या बाजूला बसलेले आहे. त्याचे दोन चालकाच्या खांद्यावर आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरने लिहिले की, हा सर्वात मस्त भारतीय फोटो बॉम्ब आहे.

https://twitter.com/Tulsi_Achia/status/1203606507415207936

व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत 1 लाखांच्या वरती व्ह्यूज आले आहेत, तर शेकडो युजर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

काही युजर्सनी लिहिले की, हे केवळ भारतातच होऊ शकते.

Leave a Comment