फाशी देण्याआधी जल्लाद कैद्याच्या कानात काय सांगतो ?


भारतात ‘रेयरेस्ट ऑफ द रेयर’ सर्वात गंभीर आणि घृणास्पद प्रकरणातच फाशीची शिक्षा होईल, असे स्पष्ट निर्देश 1983मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. न्यायालयाने 2012 मध्ये निर्भया प्रकरणातही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. आता त्यांना फाशी देण्याची वेळ जवळ आली असून अशा स्थितीत फाशी देण्याचे भारतातील नियम काय आहेत त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेलरपासून ते फाशी देणाऱ्या जल्लादपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेत काय भूमिका असते? फाशी देण्याच्या आधी जल्लाद कैद्याच्या कानात काय सांगतो?

मृत्यूचे वॉरंट फाशीची शिक्षा अंतिम झाल्यानंतर थांबवता येत नाही. हे वॉरंट दया याचिका फेटाळून लावल्यानंतर कधीही येऊ शकते. वॉरंटमध्ये फाशीची तारीख आणि वेळ लिहिलेली असते. तुरूंगातील नियमावलीनुसार फाशीची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यासह पुढील कार्यवाही केली जाते. राज्यातील प्रत्येक तुरूंगात स्वतःचे मॅन्युअल असते.

विशिष्ट नियमांचे पालन करणे एखाद्याला फाशी देताना महत्वाचे आहे. फाशीची प्रक्रिया त्याशिवाय अपूर्ण मानली जाते. नियमांचे पालन केल्याशिवाय फाशीची प्रक्रिया पूर्ण होत नाही. मृत्यूचे वॉरंट काढल्यानंतर तुला फाशी देण्यात येणार आहे, असल्याचे कैद्याला सांगितले जाते. मृत्यूच्या वॉरंटची माहिती देखील कारागृह अधीक्षक प्रशासनाला देतात. तुरुंगात जर कैद्याला फाशी देण्याची व्यवस्था नसेल तर मृत्युदंडाच्या वॉरंटनंतर त्याला नवीन तुरूंगात हलविण्यात येते.

फाशी ही सकाळी 6, 7 किंवा 8 ही वेळ दिली जाते. यामागील कारण असे सांगितले जाते की, सकाळी बाकीचे कैदी झोपलेले असतात. फाशी ज्या कैद्याला द्यायची असेल त्याला संपूर्ण दिवस थांबण्याची गरज नाही. तसेच कुटुंबालाही अंत्यविधी करण्याची संधी मिळते. 10-15 दिवस आधी कैद्याच्या कुटुंबियांना सूचना दिली जाते. कारण शेवटचे ते कैद्याला भेटू शकतील. कैद्याची तुरुंगात पूर्ण आरोग्य तपासणी केली जाते. इतर कैद्यांपासून त्याला वेगळ्या सेलमध्ये ठेवले जाते.

अधीक्षकांच्या देखरेखीखाली फाशीच्या दिवशी सकाळी पहारेकरी कैद्याला फाशीच्या खोलीत आणतात. जल्लादा व्यतिरिक्त तीन अधिकारी फाशीच्या वेळी हजर असतात. हे तीन अधिकारी तुरूंग अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि दंडाधिकारी असतात. अधीक्षक फाशी देण्यापूर्वी दंडाधिकाऱ्यास सांगतात की, कैद्याची ओळख मी करुन घेतली आहे आणि त्याचा मृत्यूदंडही वाचला आहे. मृत्यूच्या वॉरंटवर कैद्याची स्वाक्षरी देखील असते.

त्याचबरोबर फाशी देण्याआधी कैद्याला अंघोळ घातली जाते आणि त्याला नवीन कपडे देखील घातले जातात. त्यानंतर त्याला फाशीच्या दोरखंडाला लटकवले जाते. कैद्याला फाशीआधी त्याची शेवटची इच्छा विचारली जाते. तो त्यामध्ये कुटुंबियांना शेवटचे भेटण्याचे किंवा चांगले जेवण जेवण्याची अशा सामान्यतः इच्छा व्यक्त करतात.

जेव्हा एखाद्या कैद्याला फाशी दिली जाते तेव्हा त्याच्या शेवटच्या वेळी जल्लाद त्याच्या सोबत असतो. या सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात अवघड भूमिका जल्लादाची असते. जल्लाद फाशी देण्याआधी कैद्याच्या कानात काहीतरी सांगतो, त्यानंतर तो दोरखंड सोडून देतो. जल्लाद यावेळी कैद्याच्या कानात त्यांच्या धर्मानुसार नमस्कार करतो आणि मी माझ्या कामापुढे हतबल असून तुम्ही सत्याच्या मार्गाने चालाल अशी मी प्रार्थना करतो, असे सांगतो.

Leave a Comment