शिवाजी विद्यापीठाचे नामविस्तार करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना विनंती


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी, अशी विनंती केली. त्याचबरोबर राज्यातील सर्व महापुरुषांची नावे यापुढे संपूर्ण लिहण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

सीमा प्रश्नाबाबत बैठक घेतली. सीमाप्रश्न हा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याचा पाठपुरावा करणे आणि सीमा भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार योग्य ती पावले तत्काळ उचलेल. तसेच न्यायालयात महाराष्ट्र सरकारकडून योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासंदर्भात लवकरच न्याय होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment