सोशल मीडियावर व्हायरल होत आहे प्रनुतन बहलचा बोल्ड लुक - Majha Paper

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे प्रनुतन बहलचा बोल्ड लुक


बॉलिवूडमध्ये स्टार किड्सची सध्या चलती असून यावर्षी अनेक स्टार किड्सने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. या स्टार किड्समध्ये मोहनीश बहल यांची कन्या आणि ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री नूतन यांची नात प्रनुतन बहल हिचा देखील समावेश होता. मागील वर्षी ‘नोटबुक’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. पण तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करु शकला नाही.

View this post on Instagram

I’m such a thinker 💁‍♀️🤪😝

A post shared by Pranutan Bahl (@pranutan) on


‘नोटबुक’ नंतर हिंदी सिनेसृष्टीपासून दूर झालेली प्रनुतन सोशल मीडियावर सध्या चर्चेत आली आहे. सुरज बडजात्याच्या मुलाच्या लग्नात नुकतीच प्रनुतन दिसली. तिच्या त्यावेळच्या लुकची सर्वत्र चर्चा होत आहे.

View this post on Instagram

Just going with the flow 😝

A post shared by Pranutan Bahl (@pranutan) on


या लग्नात प्रनुतनने बॅकलेस ब्लाऊज आणि सिग्रीन रंगाची साडी परिधान केली होती. ती ज्यात खूपच हॉट आणि बोल्ड दिसत होती.
आपल्या इन्स्टाग्रामवर प्रनुतनने हे फोटो शेअर केले. त्यानंतर तिच्या या अदांनी सर्वच घायाळ झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.


आपल्या आजीप्रमाणेच प्रनुतन सुंदर आहे. तिच्या पहिल्या झलकमध्येच ही गोष्ट दिसली होती. पण सध्याच्या घडीला तिच्याकडे कोणताही नवा चित्रपट नाही.


कोणत्याही मॉडेलपेक्षा अभिनेता मोहनीश बहलची लाडकी लेक प्रनुतन कमी नाही. तिच्याबद्दल बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी कोणालाच काही माहित नव्हते. पण तिने बॉलिवूडमध्ये एंट्री घेत आपल्या बोल्ड अंदाजाने सर्वांनाच चकीत केले.

Leave a Comment