भारतीय सैन्याने केली चक्क प्लास्टिकच्या कचऱ्यापासून रस्त्याची निर्मिती

प्लास्टिकचा वापर हा जगभरातील एक मोठी समस्या आहे. अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या वापरावर देखील बंदी घालण्यात आलेली आहे. प्लास्टिक रिसायकल्डकरून त्याद्वारे विविध वस्तू देखील बनवल्या जात आहेत. भारतीय सैन्याने देखील प्लास्टिकचा वापर चक्क रस्ता तयार करण्यासाठी केला आहे.

गुव्हाटीमध्ये भारतीय सैन्याच्या मिलिट्री इंजिनिअर सर्व्हिसेजने नारंगी मिलिट्री स्टेशन येथे प्लास्टिकच्या कचऱ्याद्वारे रस्ता तयार करून दाखवला आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार करण्यात आलेला रस्ता बघून प्रत्येकजण भारतीय सैन्याचे कौतूक करत आहे. हा एक पायलट प्रोजेक्ट होता, ज्यासाठी जवळपास 1.24 मेट्रिक टन प्लास्टिक कचऱ्याचा वापर करण्यात आला.

रिपोर्टनुसार, भारत जगातील सर्वाधिक प्लास्टिक कचरा उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत 15 व्या स्थानावर आहे. भारतात दररोज 25,940 टन प्लास्टिक कचरा तयार होतो.

Leave a Comment