फिरण्याची आवड असेल तर भारतातील या 12 सुंदर वाळवंटांना एकदा तरी नक्की भेट द्या

जर तुम्ही फिरण्याचा प्लॅन करत असाल आणि तुम्हाला कोठे जायचे असा प्रश्न पडत असेल, तर आम्ही तुम्हाला अशी काही ठिकाणं सांगणार आहोत, ज्या ठिकाणी तुम्ही फिरण्याचा आनंद तर घ्यालच, मात्र त्याचबरोबर एडव्हेंचर देखील करू शकता.

(Source)

कच्छ, गुजरात –

45652 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेल्या गुजरातच्या या जिल्ह्याचा अधिकांश भाग वाळवंटाने व्यापलेले आहे. कच्छमध्ये बघण्यासारखी अनेक ठिकाण आहेत. ज्यातील पांढरे वाळवंट पर्यटकांना अधिक आकर्षित करते. याशिवाय मांडवी समुद्रतट देखील पाहण्यासारखा आहे.

(Source)

बिकानेर, राजस्थान –

राजस्थानमधील बिकानेर शहर वाळवंट, उंट आणि वीर राजपूत राजांच्या इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. हे शहर राठौड राजकुमार आणि राव बिकाजी यांच्याद्वारे 1488 मध्ये स्थापित करण्यात आले होते. हे शहर जगप्रसिद्ध ‘बिकानेर महोत्सव’साठी देखील ओळखले जाते. येथे जाण्यासाठी ऑक्टोंबर ते मार्च दरम्यान योग्य वेळ आहे.

(Source)

जैसलमेर, राजस्थान –

जैसलमेरला ‘गोल्डन सिटी’ म्हटले जाते. हे दिल्लीपासून 480 किमी लांब आहे. येथील वाळवंटात तुम्ही ट्रॅक्टर बाईकने देखील प्रवास करू शकता. तुम्हाला स्पोर्ट्सची आवड असेल, तर तुम्हाला ही जागा नक्कीच आवडेल.

(Source)

लेह-लद्दाख –

एडव्हेंचर ट्रॅव्हलिंग आणि बाईक रायडिंगची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. श्रीनगरवरून लेहला जाण्यासाठी पर्यटकांना जोजिला पासवरून जावे लागते. जोजिला पासला जगातील सर्वात धोकादायक रस्त्यांपैकी एक समजले जाते. येथील रस्ते हिवाळ्या हिमवर्षावामुळे बंद असतात. जून ते सप्टेंबर दरम्यान तुम्ही येथे भेट देऊ शकता.

(Source)

बाडमेर, जैसलमेर –

बाडमेर हे राजस्थानच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. या ठिकाणी अनेक जुने किल्ले आणि प्राचीन मंदिर देखील आहेत. राजस्थानचा तिसरा सर्वात मोठा जिल्हा असलेल्या बाडमेरमध्ये तेलाचे उत्पादन देखील होते. येथील मातीची भांडी, शिलाई, लाकडावरील नकाशी, नृत्य आणि संगीत या गोष्टी प्रसिद्ध आहेत.

(Source)

जोधपूर, राजस्थान – 

जोधपूरला ‘गेट वे टू थार’ म्हटले जाते. हे शहर मेहरानगढ किल्ले, निळी घरे, मंदिर, मिठाई आणि स्नॅक्ससाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही पर्वतांवर एडव्हेंचरचा अनुभव घेऊ शकता. येथे जाण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी ही योग्य वेळ आहे.

(Source)

कुंभलगढ, राजस्थान –

आपल्या विशालकाय सापांच्या किल्ल्यांसाठी प्रसिद्ध कुंभलगढ शहर राजस्थानमधील आणखी एक लोकप्रिय ठिकाण आहे. हे शहर ऐतिहासिक स्मारक, महाल आणि मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. कुंभलगढ किल्ला राजस्थानमधील दुसरा सर्वात महत्त्वाचा किल्ला आहे. येथे तुम्ही ऑक्टोंबर ते मार्च दरम्यान जावू शकता.

(Source)

चित्तौडगढ, राजस्थान –

एकेकाळची मेवाडची राजधानी, चित्तौडगढ किल्ला, खंडर आणि असंख्य कथांची भूमी आहे. हे शहर आपल्या इतिहासासाठी ओळखले जाते.

(Source)

पुष्कर, राजस्थान –

पुष्कर शहराला राजस्थानचे ‘Rose Garden’ म्हणून ओळखले जाते. येथील संस्कृति, गुलाबांचा सुगंध आणि ब्रम्हा यांचे एकमेव मंदिर या गोष्टी प्रसिद्ध आहेत. येथे तुम्ही रात्रीच्या वेळी उंटावर बसून फिरण्याचा आनंद घेऊ शकता. याशिवाय रॉक क्लायम्बिंग, रॅपेलिंग आमि जिप लायनिंग देखील करू शकता.

(Source)

नुब्रा व्हॅली, जम्मू आणि काश्मिर –

लेहपासून 130 किमी लांब लद्दाखच्या भागातील नुब्रा व्हॅली खास प्रकारचे उंट आढळतात. हे उंट सर्वसाधारण उंटांच्या तुलनेत छोटे असतात. जगातील सर्वात उंच वाहन जाणारा रोड खर्डोगला दरी नुब्रा व्हॅलीचे प्रवेशद्वारे आहे. येथे आलेले पर्यटक उंटावरून फेरफटका मारण्याचा आनंद घेतात. जून ते सप्टेंबर या काळात तुम्ही येथे येऊ शकता.

(Source)

अजमेर, राजस्थान –

अरवली पर्वतरांगानी वेढलेले अजमेर शहर संत मुइन-उद-दीन चिश्ती यांच्या दरगाह शरीफसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या परंपरा आणि संस्कृतीसाठी हे शहर ओळखले जाते. ऑक्टोंबर ते मार्च या महिन्यात तुम्ही या ठिकाणी येऊ शकता.

(Source)

खिमसर, राजस्थान –

नागौर महोत्सवासाठी प्रसिद्ध खिमसर, राजस्थानमधील एक छोटे गाव आहे. येथे जाण्यासाठी हिवाळा सर्वोत्तम आहे. कॅम्पफायर, उंट, लोक नृत्य आणि गाणी या सर्व गोष्टींचा तुम्ही येथे आनंद घेऊ शकता.