‘दबंग 3’च्या नव्या गाण्याचा टीझर रिलीज


बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा आगामी चित्रपट ‘दबंग 3’ मधील बहुप्रतिशक्षित ‘मुन्ना बदनाम हुआ’ गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी सलमान खानने या गाण्याची पहिली झलक शेअर केली आहे. प्रेक्षकांमध्ये ‘दबंग’ सिरिजमधील पहिल्या दोन चित्रपटांमधील ‘मुन्नी बदनाम’ आणि ‘फेविकॉल से’ ही दोन्ही गाणी प्रचंड गाजली होती.

असेच एक हटके गाणे यावेळी ‘दबंग 3’द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची खास झलक सलमान खानने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सलमानने पोस्ट करताना, आ रहे हैं बहुत जल्द सबसे बदमाश गाने मुन्ना बदनाम हुआ के साथ, असे कॅप्शन दिले आहे.


दरम्यान, सलमान खानसोबत ‘दबंग 3’ मधील ‘मुन्ना बदनाम हुआ’ या गाण्यात वरीना हुसैन दिसून येत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभुदेवाही या गाण्यात दिसू शकतात. हे गाणे उद्या रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटातून महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहे.

दरम्यान, सलमान खान आणि सई मांजरेकर व्यतिरिक्त या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान आणि माही गिल हे देखील मुख्य भुमिकेत दिसून येणार आहेत. यामध्ये खलनायक म्हणून साउथचे स्टार किच्चा सुदीप दिसून येणार आहेत. चित्रपट 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment