विक्री वाढवण्यासाठी मार्केटिंग एजेंसींना न्यूरो-सायंटिस्टचा आधार

ई-कॉमर्स कंपन्या आणि किरकोळ व्यापारी हे सुट्टयांमध्ये वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या ऑफर्स देत असतात. आपण जास्त खरेदी करायची नाही यासाठी अनेक मार्ग शोधतो, तर कंपन्या विक्री वाढवण्यासाठी आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे असतात. जगभरातील मार्केट एजेंसीन्यूरो-सायंटिस्टची यासाठी नियुक्ती करतात. जे शोधतात की, खरेदी करताना ग्राहकांच्या मेंदूमध्ये नक्की काय चालले आहे.

अमेरिकेच्या लाँगवूड युनिवर्सिटीमधील न्यूरोस्टडीजच्या डायरेक्टर कॅथरीन फ्रॅनसिन सांगतात की, आपण अनेकदा गरज नसताना देखील कंपन्यांच्या जाळ्यात अडकून जास्त खरेदी करतो. या निर्णयामागे भिती हे प्रमुख कारण असते.

ग्राहकांना भिती असते की, चांगली ऑफर सोडली तर पुढे त्याच वस्तूसाठी अधिक पैसे द्यावे लागतील. कंपन्या या भितीचा वापर करतात. सर्वसाधारणपणे आपल्या मेंदूमधील प्री-फ्रंटल काँर्टेक्स वस्तूंच्या प्रती आपल्या भावनांना नियंत्रित करते आणि आपल्या भितीला शांत करून तर्कहीन कार्य करण्यापासून रोखते. ते आपल्याला वेगवेगळ्या ऑफर द्वारे समजवते की, ही वस्तू खरेदी करून पैसे वाचवले जाऊ शकतात व त्याने दुसरी वस्तू खरेदी केली जाऊ शकते.

सुट्ट्यांमध्ये आपण अनेकदा जुन्या आठवणींमध्ये रमतो. आपण लहानपणीच्या आठवणींशी संबंधित वस्तू खरेदी करून आनंदी होतो. कंपनी आपल्या जाहिरातींमध्ये याचा वापर करतात व आपल्या भावनांना खरेदीमध्ये बदलतात. याप्रकारे आपण गरज नसलेली वस्तू खरेदी करतो.

कॅथरिन यांच्यानुसार, आपल्या खरेदीमध्ये सामाजिक प्रभावाची मोठी भूमिका आहे. कंपन्या याचा देखील वापर करतात. जसे की, गिफ्ट खरेदी करण्यास गेल्यावर आपण विचार करतो की महागडे गिफ्ट दिले तर अधिक महत्त्व असेल. आपण सामान्य गोष्टीत देखील ब्रँड शोधतो. सुट्ट्यांमध्ये आपली ब्रँड आणि लेबल शोधण्याची शक्यता अधिक असते. मार्केटिंग कंपन्या आपल्या याच मानसिकतेचा वापर करतात.

Leave a Comment