केवळ झोपण्यासाठी ही कंपनी देत आहे 1 लाख रुपये पगार

विद्यार्थ्यांपासून ते कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येकाची इच्छा असते की, कोणतरी त्यांना केवळ झोपण्यासाठी पगार द्यावा. केवळ झोपण्यासाठी पगार मिळत असेल, तर अशी नोकरी प्रत्येकालाच करायला आवडेल. अशीच खास ऑफर एका भारतीय स्टार्टअप ‘वेकफीट’ने आणली आहे.

काही इंटर्न्सना झोपण्यासाठी 1 लाख रुपये मिळणार आहेत. वेकफीट या स्लिप सोल्यूशन कंपनीने ;वेकफीट स्लीप इंटर्नशीप; प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्रामसाठी निवड झालेल्या इंटर्न्सना 100 दिवस प्रतीदिन 9 तास झोपावे लागेल.

वेकफीटने आपल्या वेबसाइटवर लिहिले आहे की, जर तुम्ही तुमच्या आवडीचे शो न बघता रोज रात्री 9 तास झोपू शकता असाल, तर तुम्ही या नोकरीसाठी एकदम योग्य उमेदवार आहात.

अर्ज मागवलेल्या उमेदवारांसाठी केवळ एक अट आहे, ती म्हणजे केवळ झोपणे. उमेदवाराला गादीवर पडताच 10 ते 20 मिनिटात झोप लागणे गरजेचे आहे. याशिवाय रात्री फोनच्या नॉटिफिकेशनकडे दुर्लक्ष करणे जमले पाहिजे.

कंपनी निवड केलेल्या उमेदवारांचे झोपण्याचे पॅटर्न मॉनिटर करेल. उमेदवारांना यासाठी स्लिप ट्रॅकर देण्यात येईल. जे उमेदवाराच्या झोपण्याआधी आणि झोपल्यानंतर पॅटर्न रेकॉर्ड करेल. याशिवाय उमेदवारांसाठी काउंसलिंग सेशन देखील असेल. उमेदवारांना या खास कामासाठी 1 लाख रुपये पगार दिला जाईल.

जर तुम्हाला देखील या ड्रिम इंटर्नशीपमध्ये सहभागी व्हायचे असेल तर https://www.wakefit.co/sleepintern/ या लिंकवर जाऊन तुम्ही एप्लाय करू शकता.

Leave a Comment