सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे मराठमोळी अभिनेत्री


हॉट अँड ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेचे नाव देखील आवर्जुन घ्यावे लागेल. कारण तिने आजवर आपल्या अभिनयासोबतच आपल्या लूकमुळे अनेकांना भुरळ घातली आहे. तिच्याकडे भलेही झिरो फिगर नसेल पण ती तिच्या हास्याने आणि नजरेने देखील एखाद्याला घायाळ करू शकता हे तिच्याकडे बघून अगदी पुरेपूर पटते.


सोशल मिडियावर सक्रिय असलेली नेहा नेहमीच आपल्या फॅन्ससोबत अनेक फोटो शेअर करत असते. यात तिचा फॅशन सेन्स, मादक अदा आणि कमनीय बांधा नेहमीच चर्चेत असतात.


आज या मराठीमोळ्या अभिनेत्रीचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने आम्ही तुमच्यासाठी नेहाचे काही खास फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत तिच्या हॉटनेसची झलक दिसत आहे.


वयाच्या 10व्या वर्षी बालकलाकार म्हणून नेहाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. झी मराठीवरील भाग्यलक्ष्मी या मालिकेत,तर, ‘एका पेक्षा एक अप्सरा आली’ या सेलिब्रिटी विशेष रिअ‍ॅलिटी शोमध्ये नेहा थिरकली होती. तर हिंदी मध्ये ‘मे आय कमिंग मॅडम’ नंतर नेहा कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये ‘प्रेझेंटर’म्हणून झळकली होती.


आजवर नेहाने मराठी आणि हिंदी सोडून दाक्षिणात्य भाषेत तसेच अन्य 7 विविध भाषांमध्ये काम केले आहे.


नेहा एक प्रशिक्षित क्लासिकल डान्सर असून तिने मागील वर्षी पोल डान्सचे देखील प्रशिक्षण घेतले होते.


आपल्या फिटनेसकडे नेहा अतिशय बारकाईने लक्ष देते, तिने इंस्टाग्रामवर देखील वेळोबवेळी आपले जिम लूक शेअर केले आहेत.


काहीच दिवसांपूर्वी नेहाने इंस्टाग्रामवर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती, ती अमेरिकेत स्थित एका भारतीय व्यावसायिकाशी डेट करत आहे. नेहा पेंडसे ही मराठीतील सौंदर्याला फॅशनचा तडका असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Leave a Comment