आता नेटवर्क नसताना देखील फोनवर बोलू शकतात या कंपनीचे ग्राहक

जर तुम्ही एअरटेल अथवा जिओच्या ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण या कंपन्यांचे ग्राहक आता मोबाईलमध्ये नेटवर्क नसताना देखील फोनवर बोलू शकतील. एअरटेल आणि जिओने VoWiFi म्हणजेच व्हॉइस ओव्हर वाय-फाय सर्विस सुरू केली आहे.

VoWiFi काय आहे ?

VoWiFi हे वाय फायद्वारे काम करते. याला व्हॉइस ओव्हर आयपी देखील म्हटले जाते. VoWiFi द्वारे तुम्ही कोणत्याही वाय-फाय नेटवर्कद्वारे कॉलिंग करू शकता. उदाहरणार्थ जर तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर तुम्ही वाय-वायद्वारे कोणाबरोबर देखील फोनवर बोलू शकता.

ज्याप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअॅपवर इंटरनेट नेटवर्कद्वारे कॉलिंग करता. त्याचप्रमाणे मोबाईलमध्ये नेटवर्क नसताना वाय-फाय कनेक्ट करून तुम्ही कॉलिंग करू शकता.

VoWiFi सेटिंग करण्यासाठी तुमचा स्मार्टफोन WiFi कॉलिंग सपोर्ट करणारा हवा व त्याचबरोबर तुमचा टेलिकॉम ऑपरेटर VoWiFi सुविधा देणे गरजेचे आहे. फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन नेटवर्क सेटिंग्समध्ये तपासू शकता. तुमच्या फोनमध्ये हा पर्याय असेल तर त्यावर क्लिक करून तुम्ही वापरू शकता. सध्या सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 प्लस, वनप्लस 7 टी या स्मार्टफोनमध्ये ही सेवा मिळत आहे. देशात सध्या केवळ एअरटेल आणि जिओ हेच नेटवर्क ही सेवा देत आहेत.

Leave a Comment