… म्हणून जोडप्याने महिला वेटरला चक्क कार गिफ्ट केली

अमेरिकेतील टेक्सास येथील एक महिला वेटर दररोज 22 किमी चालून आपल्या नोकरीच्या ठिकाणी म्हणजेच डेनीस रेस्टोरेंटमध्ये येते. मात्र आता तिचा हा लांबलचक चालण्याचा प्रवास लवकरच संपणार आहे. याला कारणही तसे खासच आहे. कारण या महिलेची कथा ऐकून रेस्टोरेंटमध्ये ब्रेकफास्ट करणाऱ्या एका जोडप्याने तिला चक्क कार गिफ्ट केली आहे. या कारमुळे आता महिला वेटरला दररोज 22 किमी अंतर चालत यावे लागणार नाही.

एडरिअना एडवर्ड्स अशा या महिला वेटरच नाव असून, एका जोडप्याने तिला कार गिफ्ट दिली. या जोडप्याने आपले नाव गुप्त ठेवले आहे.

हे जोडपे रेस्टोरेंटमध्ये ब्रेकफास्ट करत असताना त्यांना एडवर्डची स्टोरी कळाली. ती कार खरेदी करण्यासाठी पैसे वाचवत असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर जोडप्याने शोरूममध्ये जाऊन कार खरेदी व परत येत निसान सँट्रा ही कार त्यांनी एडवर्डला भेट दिली.

कार खरेदी करणाऱ्या महिलेने सांगितले की, गिफ्ट पाहून तिला रडायला. हीच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की, तिला हे आवडले.

या गिफ्टमुळे आता एडवर्डचा 5 तासांचा प्रवास 30 मिनिटात होईल. एडवर्ड म्हणाली की, मला अजूनही स्वप्नात असल्यासारखे वाटत आहे. मला जर दिसले की, कोणाला मदतीची गरज आहे, तेव्हा मला जेवढी शक्य असेल तेवढी मदत मी नक्की करेल.

 

Leave a Comment