अबकी बार ठाकरे सरकार! उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री


मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून येत्या एक डिसेंबरला शिवाजी पार्क येथे शपथविधी होणार आहे. या पदावर ठाकरे घराण्यातील विराजमान होणारे उद्धव ठाकरे पहिलेच नेते ठरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने या तिन्ही पक्षांनी मिळून तयार केलेल्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांना राज्याचे नेतृत्व देण्याचा निर्णय ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या शपथविधी सोहळयासाठी महापालिकेला तयारी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे कळते. उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीचे नेते म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मांडला. या प्रस्तावाला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिले.

Leave a Comment