उद्याच होणार नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी


मुंबई: उद्या राज्याच्या नव्या विधानसभेचे गठन होणार असून त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्या बुधवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता आमदारांना विधानसभेत हजर राहण्याच्या सूचना दिल्या असून उद्याच नवनिर्वाचित आमदारांचाही शपथविधी होणार आहे.

एक प्रसिद्धीपत्रक राजभवनातून काढण्यात आले असून उद्या सकाळी ८ वाजता विधानभवनात सर्व नवनिर्वाचित आमदारांना आमंत्रित करण्यात आले आहे. आज सायंकाळी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांना पद आणि गोपनीयतेची राज्यपालांनी शपथ दिल्यामुळे उद्या विधानसभेत कोळंबकर हे सर्व आमदारांना शपथ देणार आहेत. उद्या तातडीने सर्व आमदारांना विधानसभेत राज्यपालांनी बोलावल्याने उद्याच नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे उद्याच्या राजकीय घडामोडींकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment