कॉफी आणि बरेच काही..


पावसाळ्याचे दिवस, मित्रमैत्रिणींचा मोठ्ठा ग्रुप, झकास रंगात आलेल्या गप्पा हे सर्वच असले, की जोडीला गरमागरम कॉफी ही हवीच. सहज उपलब्ध होणारे, अनेक प्रकारांमध्ये मिळणारे हे पेय बहुतेकांच्या पसंतीचे असते. कॉफी वर पुष्कळ संशोधनेही करण्यात आली. त्या संशोधनांच्या मते माफक प्रमाणात केले गेलेले कॉफीचे सेवन आरोग्यास लाभदायक असते.

कॉफीच्या सेवनाने अंगदुखी कमी होण्यास मदत मिळते. कॅफीन मध्ये माफक प्रमाणात वेदनाशामक गुण असतात. कॅफीन हे चहा, कॉफी, आणि ग्रीन टी मधेही असते. बहुतेक सर्व प्राकृतिक पेयांमध्ये कॅफीन ची मात्रा कमी अधिक प्रमाणात असतेच. कॅफीन मधील वेदनाशामक गुणांमुळे स्नायूंमध्ये येणारे क्रॅम्प्स आणि अंगदुखी कमी होण्यास मदत मिळते.

कॅन्सर चा आजार आजच्या काळामध्ये मनुष्याला माहित असलेल्या आजारांपैकी सर्वात भयानक आजार आहे. कॅन्सरच्या आजारामध्ये शरीरात अनैसर्गिक रित्या पेशींची वाढ होऊ लागते आणि त्यामुळे एरवी सुरळीत चालणाऱ्या शारीरिक प्रक्रियांमध्ये अडथळे निर्माण होऊ लागतात. कॅन्सर मुळे शरीरातील सुदृढ पेशींचा नाश होऊ लागतो. कॉफीमध्ये असलेल्या औषधी तत्वांमुळे शरीरातील पेशींचा नाश होण्याच्या क्रियेला रोखणे शक्य होते. तसेच लिवर चा कॅन्सर, कोलोन कॅन्सर आणि स्तनाच्या कॅन्सरपासून कॉफी बचाव करू शकते.

असे म्हणतात, की कॉफीच्या नुसत्या वासानेच एखाद्याचे मन प्रफुल्लीत होऊन जाते. एक कप गरमागरम कॉफी घेताघेताच एखाद्याचा मूड एकदम छान होऊन जातो. याचे कारण असे, की कॉफी मध्ये असलेल्या कॅफीन मुळे मेंदूमध्ये सेरोटोनीन आणि डोपामीन या न्युरो ट्रान्समिटरचे उत्पादन होऊन त्यामुळे मनामध्ये आनंदाची भावना निर्माण होते.

कॉफीच्या सेवनाने मेंदू आणि मन सचेत राहतात. याच कारणामुळे परीक्षेच्या काळामध्ये रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करणारे विद्यार्थी, किंवा ऑफिसमध्ये रात्री उशिरापर्यंत काम करीत असलेल्या व्यक्ती, थोडेसे पेंगुळल्या सारखे व्हायला लागले की गरमागरम कॉफीचा आधार शोधताना दिसतात. कॉफीच्या सेवनाने शरीरामध्ये अॅड्रेनलीन चा संचार होऊन मेंदू सजग राहतो आणि आपले शरीरही कुठल्याही प्रकारच्या कामासाठी सज्ज होते. मात्र कॉफीचे अति सेवनही घातक ठरू शकते. कॉफीच्या अतिसेवनामुळे झोप अपुरी होऊन शारीरक थकवा जाणवू शकतो.

कॉफीमुळे मेंदूचे काम व्यवस्थित चालू राहण्यास मदत मिळते. कॉफीमुळे एकाग्रता वाढून विचार करण्याच्या शक्तीत वृद्धी होते. कॉफीच्या माफक सेवनाने अल्झायमर्स आणि पार्किन्सन्स सारख्या रोगांपासून बचाव होऊ शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment