
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर महत्वपूर्ण निर्णय दिला असून उद्या बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले असून शरद पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून हा निकाल योगायोगाने संविधान दिवस साजरा होत असताना आल्याने या निर्णयामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया
राज्यघटनेतील तत्वे व लोकशाही मूल्यांची जपणूक केल्याबद्दल सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार!
हा निकाल योगायोगाने #संविधान_दिवस साजरा होत असताना आल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाला, याचा आनंद आहे.— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 26, 2019
सन्मानीय सर्वोच्च न्यायालयाचे राज्यघटनेतील तत्वे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक केल्याबद्दल मनापासून आभार! योगायोगाने संविधान दिवस साजरा होत असताना हा निकाल आल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाला, याचा आनंद असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
