नौदलाला मिळणार देशातील पहिली महिला पायलट

हवाई दलानंतर आता नौदलाला देखील देशातील पहिली महिला पायलट मिळणार आहे. बिहारची शिवांगी स्वरूद देशातील पहिली नौदल पायल असेल. ती कोच्चीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. तिला 4 डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात बॅच लावला जाईल.

शिवांगी नौदल कोच्चीच्या ऑपरेशन ड्यूटीमध्ये सहभागी होईल. ती फिक्स्ड विंग डोर्नियर सर्विलांस विमान उडवेल. हे विमान कमी अंतराच्या समुद्री मिशनसाठी पाठवले जाते. यामध्ये आधुनिक सर्विलांस, रडार, नेटवर्किंग आणि इलेक्ट्रॉनिक सेंसर आहेत. शिवांगीला मागील वर्षी जूनमध्ये व्हाइस एडमिरल एके चावला यांनी औपचारिकरित्या नौदलात सहभागी केले होते.

शिवांगीने 2010 मध्ये डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसई 10ची परिक्षा दिली. त्यानंतर तिने 12 वी सायन्समधून दिल्यानंतर इंजिनिअरिंग केले. एसएसबी परिक्षेद्वारे तिची सब लेफ्टिनेंट म्हणून निवड झाली. प्रशिक्षणानंतर तिची पहिली महिला पायलट म्हणून निवड करण्यात आली.

Leave a Comment