150 देशातील नागरिकांनी 50 टन फुलांपासून कार्पेट बनवत रचला विक्रम

दुबईमध्ये 150 देशातील 5000 जणांनी मिळून 1 लाख वर्गफूट जागेत 50 टन फुलांनी कार्पेट तयार करत विक्रम नोंदवला आहे. त्यांनी तीन वर्षांपुर्वी इटलीतील विक्रम मोडला. नैसर्गिक फुलांनी बनलेले कार्पेट दोन फुटबॉल मैदानांच्या समान आहे. या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.

हे नॅशनल फेस्टिवल फॉर टॉलरेंस अँन्ड ह्युमन फ्रॅटर्निटी 2019 चा एक भाग होते. याचा उद्देश यूएईमध्ये सहिष्णूता आणि मानवता या मुल्यांना प्रोत्साहन देणे हा आहे.

सहिष्णूता मंत्रालयाचे महासंचालक अफरा अल साबरी यांनी सांगितले की, देशातील सर्वात महत्त्वाची स्थळे शेख जायद मस्जिद आणि बुर्ज खलिफा युएईच्या वारशाचा संदेश देतात. याच वारशासाठी कार्यालयाने फूलांच्या कार्पेटचे एक खास डिझाईन निवडले होते.

Leave a Comment