जयललितांच्या बायोपिकमधील लूकवरून ट्रोल झाली कंगना

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरील थलाइवी या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगना राणावत जयललिता यांची भूमिका साकारणार आहे.

पोस्टरमध्ये कंगना वाटतच नाही. त्यामुळे कंगनाचे चाहते तिचा आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार निश्चितच असल्याचे म्हणत आहेत. तर काहीजण फेक दिसत असल्याचे देखील म्हणत आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमुळे लोक निराश झाल्याचे दिसले. सोशल मीडियावर पोस्टरवरून कंगनाला ट्रोल केले जात आहे.

कंगनाच्या टीमने पोस्टर शेअर करत लिहिले की, तुम्हाला या महान व्यक्तीबद्दल माहिती आहे, मात्र त्यांची कहानी अद्याप सांगायची आहे.

सोशल मीडियावर कंगनाला या पोस्टरवरून ट्रोल करण्यात येत आहे. अनेक युजर्स ही कंगना म्हणून ओळखूच येत नसल्याचे म्हणत आहेत. तर काहीजण फेक मेकअप असल्याचे म्हणत आहेत.

एका युजरने तर कंगना जयललिता न वाटता स्मृती इराणी वाटत असल्याचे देखील म्हटले.

थलाइवी चित्रपटाचे दिग्दर्शन विजयने केले आहे. या चित्रपटात कंगनाबरोबरच रोजा चित्रपटातील अभिनेते अरविंद स्वामी देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 20 जून 2020 ला हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत रिलीज होणार आहे.

Leave a Comment