
मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सकाळी झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर त्यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी असून काही वेळापूर्वी अजित पवार आपण योग्यवेळी प्रतिक्रिया व्यक्त करू असे म्हणाले होते. त्यानंतर काही वेळीपूर्वी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे अजित पवारांच्या भेटीसाठी गेले होते. अजित पवारांच्या निर्णयामागचे कारण जाणून घेण्याबरोबरच मनधरणी करण्याचा प्रयत्न या भेटी दरम्यान केला गेला.
अजितदादांची मनधरणी करायला गेलेल्या नेत्यांच्या पदरी अपयश
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शपथविधी कार्यक्रमापासून त्यांचे मोठे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी आहेत. त्यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे अजित पवार यांच्या भेटीला गेले होते. मात्र, त्यांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीला अपयश आल्याचे दिसून आले. अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर बाहेर पडलेल्या तिन्ही नेत्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणे टाळले.
