अमृता फडणवीसांच्या देवेंद्र फडणवीस, अजित पवारांना शुभेच्छा


मुंबई – शनिवारी सकाळी राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता फडणवीस यांनी एका ट्विटच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे अभिनंदन, तुम्ही करुन दाखवलं! असे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणे हा सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. कारण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महा विकास आघाडी सरकार बनवेल असे काल रात्रीपर्यंत चित्र होते. मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमती झाली असल्याचेही शरद पवार म्हणाले होते. पण आज सकाळी अचानक चित्र एकाएकी बदलले आणि महाराष्ट्रात एका नवीन राजकीय समीकरणाचा उदय झाला.

Leave a Comment