सोनाली कुलकर्णीच्या सस्पेंन्स, थ्रीलर अशा विक्की वेलिंगकरचा ट्रेलर रिलीज


आतापर्यंतचा सर्वात हटके रोल असलेला ‘विक्की वेलिंगकर’ हा चित्रपट घेऊन अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा लवकरच आपल्या भेटीला येत आहे. सोनाली या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच कॉमिक बुक आर्टिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून सोनालीच्या दमदार अभिनयाची झलक यात पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे फर्स्ट लूक प्रदर्शित होताच या चित्रपटाविषयी उत्सुकता आणखीनच वाढली होती. त्यातच सस्पेंन्स, थ्रीलर भरून असलेल्या या ट्रेलरमुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीनच ताणली गेली आहे.

आश्चर्यकारक गोष्टींनी अनेकांचे आयुष्य भरलेले असल्यामुळे काळाबरोबर नेहमीच आपली स्पर्धा सुरु असते. पण यातील विक्कीची घालमेल या काळाच्या विळख्यातून बाहेर पडण्याची सुरु असून तो यातून यशस्वीरित्या सुटेल का? ते या ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे. सौरभ वर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सोनालीसह या चित्रपटात स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी यांच्या भूमिका आहेत. 6 डिसेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होणार आहे.

Leave a Comment