पेटीएम केवायसीच्या नावाखाली फसवणूक, कंपनीने केले ग्राहकांना सावध

पेटीएम केवायसीच्या नावाखाली ग्राहकांची सातत्याने फसवणूक होत आहे. अनेक लोकांना लाखोंचा गंडा घालण्यात आलेला आहे. सातत्याने होणाऱ्या फसवणुकीमुळे पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी एक सुचना जारी केली आहे.

पेटीएमने सांगितले की, मागील काही महिन्यात फसवणुकीसाठी नवीन पद्धत शोधण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना कॉल करून त्यांनी केवायसी सीमा समाप्त झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर ते AnyDesk, TeamViewer, QuickSupport सारखे अॅप डाउनलोड करण्यास सांगतात.

जर तुम्हाला कोणी कॉल करून सांगतिले की, पेटीएम केवायसी समाप्त झाली आहे व फोन अथवा एसएमएसच्या माध्यमातून ती पुर्ण करा. तर अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका.

हे अॅप इंस्टॉल केल्यानंतर फसवणुक करणारे 9 अंकी कोड तुम्हाला एसएमएसद्वारे पाठवतात. त्यानंतर तुमचा लॅपटॉप अथवा डिव्हाईस एक्सेस केले जाते. यामुळे तुमच्या डिव्हाईसमधील बँकिंग अॅप तसेच यूपीआय वॉलेट एक्सेस करून तुमची फसवणूक केली जाते.

अशा कॉलद्वारे पाठवण्यात येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. पेटीएम अथवा पेटीएमचे कर्मचारी अशाप्रकारे कॉल करून कधीच केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्यास सांगत नाहीत.

कंपनीने म्हटले आहे की, ग्राहकांचे केवायसी केवळ त्यांच्या एजेंटद्वारे केले जाते. याशिवाय तुम्ही पेटीएम अॅपवर देखील मिनिमम केवायसी प्रक्रिया पुर्ण करू शकता. त्यामुळे पेटीएमच्या नावाखाली येणाऱ्या कॉलला उत्तर देऊ नका. अन्यथा तुमचे खाते रिकामे होईल.

Leave a Comment