जगातील या 5 सर्वात श्रीमंत नेत्यांसमोर जेफ बेजोस आणि बिल गेट्स पाणीकम


जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती असेलच, त्यातच काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील आपले अव्वल स्थान गमावले असून त्यांची जागा मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी घेतली आहे. बिल गेट्स पुन्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले असल्याची माहिती दिली होती. पण आम्ही आज तुम्हाला जगभरातील अशा काही नेत्यांबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्याकडे एवढी संपत्ती होती. ज्यांच्यापुढे जेफ बेजोस आणि बिल गेट्स टिकूच शकणार नाहीत.

1965 ते 1986 पर्यंत फिलिपिन्सवर राज्य करणारे फर्डिनेंड मार्कोस हे जगातील सर्वात श्रीमंत नेत्यांमध्ये गणले जातात. त्यांची एकूण मालमत्ता अंदाजे 3.80 लाख कोटी रुपये एवढी सांगितली जाते.

1968 ते 1998 या काळात सुहारतो यांनी इंडोनेशियात सत्ता काबीज केली. त्यांच्याकडे सर्वात भ्रष्ट नेत्याची पदवी होती. त्यांची अंदाजित मालमत्ता अंदाजे 3.95 लाख कोटी रुपये एवढी असल्याचे सांगितली जाते.

1990 ते 2012 पर्यंत येमेनच्या सत्तेवर राज्य करणारे अली अब्दुल्ला सालेह हे सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी एक आहेत. त्यांची एकूण मालमत्ताही 4.59 कोटींपेक्षा जास्त होती.

इतिहासातील दुसरा श्रीमंत नेता इजिप्तचा होसनी मुबारक आहे. 1981 ते 2011 या काळात सत्तेत असलेल्या होसनी यांनी आपल्या कार्यकाळात बरीच संपत्ती कमावली होती. त्यांची अंदाजित मालमत्ता 5 लाख कोटींपेक्षा जास्त होती.

जगाच्या इतिहासातील सर्वात श्रीमंत नेता म्हणजे लिबियाचा मुअम्मर गद्दाफी. 1977 ते 2011 पर्यंत राज्य करणारे गद्दाफी यांच्याकडे 14 लाख कोटींपेक्षा जास्त संपत्ती होती.

Leave a Comment