व्हायरल ; एमबीएची ही विद्यार्थीनी डान्सच्या माध्यमातून करते ट्रॅफिक कंट्रोल


इंदूर – आपल्या अनोख्या शैलीत ट्रॅफिक कंट्रोल करत असल्यामुळे एमबीएची विद्यार्थीनी शुभी जैन चर्चेत आहे. डान्ससोबत शुभी ट्रॅफिक कंट्रोल करते. पोलिसांसोबत शुभी इंदू स्वयंसेवक म्हणून काम करत आहे.

पुण्यातील सिम्बायोसिस कॉलजची 23 वर्षीय शुभी जैन विद्यार्थीनी आहे. ती इंदूरमधील रहदारी सुधारण्यासाठी इंटर्नशिपवर आली आहे. लाल सिग्नलवर वाहनचालक थांबताच ती त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना वाहतूकीचे नियम समजावून सांगते. दुचाकीवर हेलमेट वापरणाऱ्यांवर ती सॅल्यूट करते आणि हेलमेट ज्यांनी नाही घातले त्यांना हात जोडून हेलमेट परिधान करण्याची विनंती करते. त्याचबरोबर ती कार चालकांना सीट बेल्ट लावण्याचा आग्रह करते.


सोशल मीडियावर शुभी जैनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एडीजी वरुण कपूर यांनी तिचा सन्मान केला. शभीने सांगितले की, ती रहदारी जनजागृती अभियानात सामील होऊन केवळ लोकांना जागरूक करत नाही, तर तिचे मित्र आणि परिवाराच्या लोकांना देखील या वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी जागरूक करते.

Leave a Comment