स्मार्टफोनमधील व्हायरसमुळे स्क्रीन लॉक असताना देखील रेकॉर्ड होत आहे व्हिडीओ

दिवसेंदिवस स्मार्टफोनमध्ये व्हायरसचा धोका वाढत चालला आहे. व्हायरसच्या समस्येशी निपटण्यापासून मोठमोठ्या टेक कंपन्यांना देखील यश मिळत नाहीये. आता अँड्राईड स्मार्टफोनसंबंधित एका बगची माहिती मिळाली आहे. या व्हायरसद्वारे डिव्हाईसची स्क्रीन लॉक असताना देखील हॅकर्सला फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड करता येतात.  गुगल आणि सँमसंगने देखील हा बग कन्फर्म केला आहे.

या बगचा शोध सिक्युरिटी फर्म चेकमार्क्सने लावला आहे. स्मार्टफोन कॅमेरा हॅक करणाऱ्या या बगला CVE-2019-2234 हे नाव देण्यात आलेले आहे. चेकमार्क्सशी संबंधित टीमच्या एका सदस्याने आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले की, आमच्या टीमने गुगल पिक्सल 2एक्सएल आणि पिक्सल 3 वर गुगलच्या कॅमेरा अॅपचा रिसर्च केला. या रिसर्चमध्ये या बगची माहिती मिळाली.

रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, हा बग फोटो आणि व्हिडीओ काढण्यासोबतच डिव्हाईसची स्क्रीन लॉक असताना देखील सुरू असतो. एवढेच नाही फोन कॉल सुरू असताना देखील आपले काम सहज करू शकतो. हा बग जीपीएस हॅक करून युजरच्या लोकेशनवर देखील लक्ष ठेवतो.

संशोधकांनी सांगितले की, अँड्राईड कॅमेरा एप्लिकेशन सर्वसाधारणपणे फोटो आणि व्हिडीओला एसडी कार्डमध्ये स्टोर करतो. अशावेळेस अॅपला एक्सेस करण्यासाठी परवानगीची गरज असते. सध्या गुगल आणि चेकमार्क्सची टीम हा बग काढून टाकण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Leave a Comment