इमरान हाश्मीच्या ‘द बॉडी’मधील पहिले गाणे रिलीज


आगामी सस्पेन्स थ्रिलर असलेल्या ‘द बॉडी’ चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. नुकतेच या चित्रपटातील पहिले वहिले रोमॅन्टिक गाणे रिलीज करण्यात आले असून हे गाणे ऑर्को, तुलसी कुमार यांनी गायले आहे. तर या गाण्याचे बोल आर्कोने लिहिले आहे.

हे गाणे इमरान हाश्मीसोबत अभिनेत्री शोभिता धूतिपाला आणि वेदिका यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. शोभिता या चित्रपटात इमरान हाश्मीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘द बॉडी’ हा एक स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट दिग्दर्शक पॉलो यांनी दिग्दर्शित केला होता. आता त्यांनीच हा हिंदी रिमेकही बनवला आहे. हा चित्रपट १३ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment