कठीण प्रसंगात शेवटच्या क्षणापर्यंत हार मानू नका, आनंद महिंद्रांचे भन्नाट ट्विट


आपल्या प्रत्येक ट्विटसाठी कायम चर्चेत राहणाऱ्या प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या प्रत्येक ट्विटमध्ये एक संदेश दडलेला असतो. आता आपल्या ट्विटर हँडलवरुन आनंद महिंद्रा यांनी एक कबड्डीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमधून छोटया, छोटया अपयशांनी खचून जाणाऱ्यांसाठी शिकण्यासारखे भरपूर काही आहे.


आनंद महिंद्रा यांनी कबड्डी सामन्याचा एका व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये चढाईपटू प्रतिस्पर्धी संघातील बचावफळीतील एका खेळाडूला बाद करतो. त्यानंतर आपल्या क्षेत्रात चढाईपटू लगेच निघून जाण्याऐवजी मध्यरेषेच्या जवळ उभा राहतो. त्यावेळी बाद झालेला खेळाडू चालत चढाईपटूच्या दिशेने जातो. खरंतर चढाईपटूची बाजू वरचढ असते. त्यामुळे बाद झालेल्या खेळाडूला फारशी संधी नसते. पण चढाईपटूला बाद झालेला खेळाडू आत खेचताच बचावफळीतील अन्य कबडीपट्टू चढाईपटूची कोंडी करुन त्याला बाद करतात. काही क्षणांपूर्वी अशक्य वाटणारी एक गोष्ट शक्य होते. हाच या व्हिडीओ मागचा खरा अर्थ आहे. आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटच्या संदेशामध्ये कठीण प्रसंगात शेवटच्या क्षणापर्यंत हार मानू नका. कारण अपयशाला सुद्धा यशामध्ये बदलता येते. प्रो कबड्डी लीगमध्ये असे स्टंट फारसे पाहायला मिळाले नसल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment