नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला हिमेशचे ‘आशिकी में तेरी’


नुकतेच संगीतकार, गायक आणि अभिनेता हिमेश रेशमिया आणि रानु मंडल यांनी गायलेल्या आशिकी में तेरी या गाण्याच्या नव्या व्हर्जनचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या गाण्याचा टीझर रिलीज होताच यूट्युबवर या गाण्याने धुमाकुळ घातला आहे. सध्या हे गाणे युट्यूबवर एक नंबरला ट्रेंड करत आहे. हिमेश रेशमिया या गाण्याच्या व्हिडीओमध्ये पुन्हा एकदा आपल्या जुन्या कॅप घातलेल्या लूकमध्ये दिसत आहे. या गाण्याला २४ तासांच्या कालावधीत तब्बल लाखो हिट्सही मिळाले आहेत. पुन्हा एकदा रानू मंडल आणि हिमेश रेशमियाच्या जोडीने धुमाकुळ घातला आहे.

हॅपी ‘हार्ड अँड हिर’ या चित्रपटातील रानू मंडल आणि हिमेश रेशमियाचे हे गाणे आहे. हिमेश रेशमियाचा नवा हटके अंदाज या चित्रपटात पहायला मिळत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तीन गाणी रानू मंडल यांनी गायली आहेत. एका चित्रपटासाठी गाण्याची ऑफर हिमेश रेशमियाने त्यांना दिली होती. तेरी मेरी कहानी, आदत आणि आशिकी में तेरी ही तीन गाणी त्यांनी गायली आहेत.

Leave a Comment