… म्हणून त्यांनी चक्क हॉस्पिटलमध्ये केले लग्न

हॉस्पिटल हे नक्कीच लग्न करण्याचे ठिकाण नाही. मात्र आलियाह आणि मायकल थॉम्सन या कपलने चक्क हॉस्पिटलमध्येच लग्न केले. या लग्नाचे कारण अनेकांच्या मनाला स्पर्शुन जात आहे.

मायकल अर्थात नवरदेवाचे वडिल सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये भरती होते. त्यामुळे अशा परिस्थितीत ते आपल्या मुलाच्या लग्नासाठी उपस्थित राहू शकत नव्हते. वडिल लग्नासाठी येऊ शकत नसल्याने या कपलने थेट वडिलांसमोर हॉस्पिटलमध्येच जाऊन एकमेंकाना रिंग घातली. या मुळे मायकलच्या वडिलांना या लग्नाला मुकावे लागले नाही. याशिवाय त्यांना चर्चमध्ये जाऊन पारंपारिक पद्धतीने देखील लग्न केले.

Posted by Baylor Scott & White Health on Tuesday, November 12, 2019

मायकलचे वडिल अॅडमिट असलेल्या हॉस्पिटलने या कपलचे रिंग घालतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

Posted by Baylor Scott & White Health on Tuesday, November 12, 2019

आलियाएने सांगितले की, मायकलच्या वडिलांनी लग्नासाठी उपस्थित राहणे खूप महत्त्वाचे होते. मात्र डॉक्टर्स त्यांना सोडत नव्हते. त्यामुळे आम्ही ही कल्पना शोधून काढली. हॉस्पिटला स्टाफ देखील त्यांच्या या हटके लग्नात सहभागी झाला होता.

 

 

Leave a Comment