आता घरबसल्या जाणून घ्या तुमच्या नजीकच्या एटीएममध्ये पैसे आहेत की नाही


नवी दिल्ली – आजच्या डिजिटल युगात लोकांनी घरात पैसे ठेवणे बंद केल्यामुळे, आपली निर्भरता एटीएमवर अवलंबुन आहे. त्याचबरोबर रोकड काढण्यासाठी काहीवेळा आपल्याला रांग लावावी लागते. त्यातच कधी एटीएममधील पैसे संपल्यामुळे होणारा मनस्ताप हा वेगळाच असतो. त्यामुळे आपल्याला अनेक एटीएमच्या खेटा मारायला लागतात.

या गैरसोयीवर मात करण्यासाठी युनियन बँकेने आपल्या ग्राहकांना मदत करण्यासाठी यू मोबाइल नावाचे मोबाइल अॅप सुरू केले आहे. यामुळे ग्राहकांना एटीएममध्ये रोकड आहे की नाही हे आधीपासूनच कळू शकेल. या कामासाठी बँकेने लाइव्ह सर्व्हेची व्यवस्था केली आहे. याच्या मदतीने बँकेच्या कोणत्या एटीएममध्ये रोकड आहे आणि कोणते रिकामे आहे, हे मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून कळणार आहे. एटीएमवर ग्रीन मार्क दिसेल तिथे पैसे असतील तर रिक्त असलेल्या एटीएमच्या ठिकाणी लाल खूण दिसेल.

युनियन बँकेचे देशभरात सुमारे 7000 एटीएम आहेत. युनियन बँकेच्या या अ‍ॅपचे वैशिष्ट्य म्हणजे ते 3 वेगवेगळ्या अंतरावर (0-3 किमी, 3-5 किमी, 5-10 किमी) एटीएम चिन्हांकित करू शकते. युनियन बँक ऑफ इंडियाचे सीएमडी राजकिरण राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, युनियन बँक ऑफ इंडियाचे यू-मोबाइल नावाचे अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपद्वारे आपल्याला एटीएममधील रोख रक्कम किंवा रिकामे एटीएमची माहिती मिळेल. आपण हे अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी Google Play Store ची मदत घेऊ शकता. या मोबाइल अ‍ॅपची लिंकही बँकेच्या वेबसाइटवर मिळेल.

Leave a Comment