राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी 2’चा दमदार ट्रेलर रिलीज


राणी मुखर्जी यांच्या ‘मर्दानी 2’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. कोटा बलात्काराच्या खऱ्या घटनेवर प्रेरित होऊन हा चित्रपट यावर्षी 13 डिसेंबरला रिलीज होणार आहे. मर्दानी 2 च्या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. खाकी गणवेशात राणी मुखर्जींचा तीक्ष्ण स्वर आणि प्रतिरोध प्रभावित करते.

ट्रेलर पाहिल्यानंतर लोक सोशल मीडियावर राणी मुखर्जीचे कौतुक करीत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले- मर्दानी 2 चा ट्रेलर लाजवाब आहे. राणी नेहमीच बॉलिवूडची राणी राहशील. छान टीम वर्क. चाहते आता राणीच्या चित्रपटाचे सुपरहिट म्हणून वर्णन करत आहेत. गिरीश जोहरने मर्दानी 2 चे वर्णन सॉलिड, इम्प्रेसिव आणि मस्ट वॉच म्हणून केले आहे.

एका वापरकर्त्याने लिहिले- ट्रेलर पाहिल्यानंतर माझ्या अंगावर काटा उभा राहिला. राणीची जबरदस्त वापसी. हृदयाला स्पर्श करणार ट्रेलर मी दोनदा पाहिला आहे. चित्रपटात अ‍ॅक्शन आणि इमोशनलचे मिश्रण आहे. बरेच नेटकरी मर्दानी 2 ला राणी मुखर्जीच्या कारकीर्दीतील सर्वात हिट चित्रपट म्हणत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले- ट्रेलरबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खलनायक समोर आलेला नाही.

मर्दानीचे दिग्दर्शन गोपी पुतरन यांनी केले आहे. आदित्य चोप्राने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यापूर्वी 2014 मध्ये राणी मुखर्जीची मर्दानी रिलीज झाला होता. या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. मानवी तस्करीवर आधारित हा चित्रपट होता. आता यावर्षी रिलीज होणारा मर्दानी बलात्काराच्या घृणास्पद घटनांवर आधारित आहे. हा ट्रेलर रिलीज झाल्याच्या तासाभरात 5 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

Leave a Comment