अक्षयने शेअर केले गुड न्यूजचे तीन पोस्टर


बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हा आगामी गुड न्यूज या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयने नुकतेच या चित्रपटाचे तीन पोस्टर रिलीज केले आहेत.


अक्षयने ट्विटरवर तीन वेगवेगळे पोस्टर शेअर केले आहेत. तो यातील एकामध्ये दोन बेबी बम्प्सच्या मध्ये फसलेला दिसत आहे. या पोस्टरसोबत त्याने, ख्रिसमसच्या या सीजनमध्ये काही गुड न्यूज देऊ, वर्षाच्या आगामी सर्वात मोठ्या गुफ-अपसाठी सोबत राहा, असे म्हटले आहे.


दिलजीत दोसांझ चित्रपटाच्या इतर पोस्टर्सपैकी एकामध्ये अक्षय कुमारसारखीच पोज देत आहे. तर दुसऱ्यामध्ये अक्षयसोबत करिना कपूर, दिलजीत दोसांझ आणि किआरा आडवाणी दिसत आहेत.


चित्रपटात अक्षय आणि करिना विवाहित जोडप्याच्या रूपात दिसणार आहेत जे बाळासाठी प्रयत्न करत असतात. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटातून राज मेहता दिग्दर्शक म्हणून डेब्यू करत आहे. हीरू जोहर, अरुणा भाटिया, करण जोहर, अपूर्वा मेहता आणि शशांक खेतानने या चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट 27 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment