बांगलादेशी खेळाडूंनी एकाच दिवसात फस्त केली तब्बल 100 अंडी

बांगलादेशचा क्रिकेट संघ सध्या भारतीय दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना आजपासून इंदौरमध्ये सुरू झाला आहे. नागपूरवरून बांगलादेशचा संघ 11 नोव्हेंबरला इंदौरमध्ये दाखल झाला. सध्या बांगलादेशच्या संघाचा मुक्काम इंदौरच्या हॉटेल मेरिएटमध्ये आहे. हॉटेलमधील मुक्कामाच्या पहिल्याच दिवशी बांगलादेश संघाने 100 अंडी फस्त केली आहेत. याशिवाय संघाने महिन्याभरापुर्वीच हॉटेलला जो मेन्यू पाठवला होता. त्यात 3 प्रकारच्या माशांची मागणी केली होती. ती देखील पुर्ण करण्यात येत आहे.

तीन प्रकारच्या माशांमध्ये एलिसा, पॉपलेट आणि झींग्याचा समावेश आहे. कसोटी सामन्याचे आयोजक मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने भारतीय संघाला हॉटेल रेडिसन आणि बांगलादेशच्या संघाला हॉटेल मेरिएटमध्ये थांबवले आहे.

आजपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यानच्या जेवणाची व्यवस्था हॉटेल रेडिसनला सोपवण्यात आली आहे. दोन्ही संघाना तेथूनच जेवणे येणार आहे.

Leave a Comment