डोळ्यांवर पट्टी बांधून पेंढ्यांपासून तयार करतो वस्तु, मुख्यमंत्र्यांनी देखील केले कौतूक

पेंढ्यापासून वस्तू तयार केल्याने सध्या कलाकार अभिषेक कुमार चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे या वस्तू या कलाकारने डोळ्यावर पट्टी बांधून तयार केल्या आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी देखील या कलाकाराचे कौतूक केले आहे. अभिषेक कुमारने गुरू नानक देव यांच्या 550 व्या प्रकाश पर्वच्या निमित्ताने सुल्तानपूर लोधी येथे पेंढ्यांपासून बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवले होते. स्वतः अमरिंदर सिंह देखील हे बघायला आले होते. त्यांनी आपले घर सजवण्यासाठी देखील काही वस्तू खरेदी केल्या.

अभिषेक कुमार चौहान पटियालातील राजपूरा येथील आहे. वाढत्या प्रदुषणामुळे दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमध्ये पेंढ्या जाळणे वादाचा मुद्दा ठरत आहे. याच कारणामुळे अभिषेकच्या कामाचे लोक कौतूक करत आहेत. त्याने सांगितले की, या प्रकारच्या अनेक आयडियांवर काम करता येईल. जेणेकरून लोकांना पेंढ्या जाळण्याची गरज भासणार नाही.

अभिषेक नेत्रहीन मुलांना देखील ही कला शिकवत आहेत. जेणेकरून ते कोणासाठी ओझे बनणार नाहीत. राजस्थानमधील 400 शाळा-कॉलेजमध्ये त्याने आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन केले होते.

Leave a Comment